Trending

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा !

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरे तर राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भ अन मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. 16 मार्चपासून वादळी पावसाला सुरुवात झाली असून काल 19 मार्च 2024 ला विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी अवकाळी अन गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

मोफत स्कूटी योजेनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा ..!

मराठवाड्यात देखील काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. यामुळे या सदर विभागातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून त्यांची रब्बी हंगामातील काढणी योग्य पिके यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत.

तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले,

लाभार्थी यादीत नाव तपासा ..! 

या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा सदर विभागातील शेतकऱ्यांच्या गहू आणि हरभरा या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय कांदा तसेच इतर फळ पिके देखील यामुळे प्रभावित झाली आहेत.

विशेष म्हणजे अवकाळी पावसाचे हे संकट अजूनही कायमच आहे. हवामान खात्याने आज देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे. Maharashtra Rain

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपायचे वैयक्तिक कर्ज देत आहे एका दिवसात ..!

कुठं बरसणार अवकाळी पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ अन दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

यामुळे, सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस सकाळी पावसाचे हे सावट असेच कायम राहण्याची शक्यता आहे. आज सुद्धा राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. आय एम डी ने विदर्भ विभागातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

खरंतर विदर्भात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. याशिवाय मार्च महिन्याच्या सुरुवातीला देखील विदर्भात अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळाले होते. दरम्यान गेल्या 4-5 दिवसापासून अवकाळीचे सत्र पुन्हा एकदा सुरु झाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक या वादळी पावसामुळे वाया जाणार अशी भीती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *