Trending

Land Record Online : 1880 पासूनचे खाते उतारे ,सातबारा , आणि जुने फेरफार पहा !

Land Record Online : जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे. land record online

येथुन ऑनलाइन 1980 चे खाते उतारे काढा

फक्त एका क्लिक वर ..!

यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

लेक लाडकी योजना, या योजनेंतर्गत मुलींना सरकार देते 75000 हजार रुपये,

असे करा ऑनलाईन अर्ज ..!

जुने अभिलेख कसे पाहायचे ? Land Record

  • जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
  • इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.
  • या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
  • तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
  • पण, जर तुम्ही पहिल्यांदाच इथं आला असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं नवीन वापरकर्ता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • एकदा का तुम्ही इथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती द्यायची आहे.
  • यामध्ये तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे.

ही बँक 50 हजार ते 5 लाख रुपयांचे सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज फक्त 10 मिनिटांत देईल, येथून ऑनलाइन अर्ज करा ..!

Online Land Record

  • त्यानंतर तुम्ही व्यवसाय काय करता ते सांगायचं आहे, जसं की business, service कि other म्हणजेच यापैकी वेगळं काही करता ते सांगायचं आहे.
  • यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारीख लिहायची आहे.
  • वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे.
  • यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक (कितव्या मजल्यावर राहता), इमारत किंवा घरावर काही नाव असेल तर ते लिहायचं आहे.
  • त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप फॉर्मवर येऊन जातं.
  • पुढे गल्लीचं नाव, गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आहे.
  • ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन -आयडी तयार करायचा आहे.
  • तो जर नसेल, तर त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ४ ते ५ प्रश्न असतात, सोपे असतात, त्यापैकी एकाचं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर Captcha टाईप करायचा आहे. म्हणजे इथं दिसणारे आकडे किंवा अक्षरं पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.

Land Record Online 2024

सगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगइन करण्यासाठी, असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.
आता आपण सुरुवातीला फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया.
यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे. यात तुम्हाला कोणता उतारा हवा आहे तो निवडायचा आहे.
आता मी फेरफार उतारा निवडला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.
उदाहरणार्थ समजा मला 1982मधील फेरफार पाहायचा आहे म्हणून मी त्यासमोरील कार्टमध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केलं आहे.
त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाऊनलोड सारांश नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल, इथं तुमच्या फाईलची सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिली आहे. त्यासमोरील फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक ओपन होईल.
या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.
त्यानंतर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. यात जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले, ते कधी झाले याची माहिती दिलेली असते.
याचपद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *