Trending

Monsoon Update : यंदा कसा राहील पावसाचा अंदाज…! ; महाराष्ट्रात कसा राहील पाऊस ?

Monsoon Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरिपाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची जमीन मशागत चालू असेल. नवीन खरीप हंगामाची शेतकरी मोठ्या आशेनं वाट पाहतोय. यावर्षी तरी बळीराजाला सुखाचे दिवस येतील या आशेवर बळीराजा शेतात घाम गाळतोय.आपल्या कडे मान्सून तसा बे भरवश्याचाच आहे, पण मनात उत्सुकताही असेल कि यावर्षी चा मान्सून कसा राहील चला तर पाहूया.कसा आहे यावर्षीचा पावसाचा अंदाज.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपायचे वैयक्तिक कर्ज देत आहे एका दिवसात ..!

यंदा कसा राहील पावसाचा अंदाज ?  Yanda kasa Rahil Pavsacha Andaj?

यावर्षी मान्सून सामान्यांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज खाजगी हवामान संस्था स्कायमेट ने सोमवारी व्यक्त केला. स्कायमेटच्या मान्सून पूर्वानुमाना नुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ८१६.५ मी.मी. पाऊस पडणार आहे. तो जवळपास मागील मान्सून च्या तुलनेत ९४% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.स्कायमेटने जे ४ जानेवारी ला भाकीत केले होते तेच कायम राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

बंधन बँकेकडून 5 मिनटात 50,000 लोन घेण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रबंध निदेशक श्री.जतीन सिंह यांच्या म्हणण्यानुसार ट्रिपल-डीप-ला नीना च्या माध्यमातून मागील चार हंगामात सामान्य किंवा सामान्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. आता ला नीना चा प्रभाव संपला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कसा राहील पाऊस ?

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात जुलै आणि आगस्ट मध्ये सामान्यांपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे.महिण्यावारी पाऊस कसा पडेल ते आपण पाहू.

        💠 जून-      सरासरीच्या ९९% (शक्यता ८०%)

        जुलै –     सरासरीच्या ९५% (शक्यता ७०%)

        💠ऑगस्ट -सरासरीच्या ९२% (शक्यता ४०%)

        💠सप्टेंबर – सरासरीच्या ९०%  (शक्यता ३०%)

स्कायमेटने घोषित केलेल्या भाकितामुळे बळीराजामध्ये चिंतेचे वातावरण आहे.स्कायमेट चा अंदाज चुकीचा ठरो, व यावर्षी चांगला पाऊस होवो हीच ईश्वर चरणी पार्थना. तुम्हाला काही कमेंट करायचे असतील तर नक्की करा. व हि माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यास माझी मदत करा.धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *