Trending

Weather Upcome Update : महाराष्ट्रासह १३ राज्यांना बसणार गारपीटीचा तडाखा ; कुठे कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट…!

Weather Upcome Update : भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. Weather Update

Weather Upcome Update कुठे कुठे कोसळणार पाऊस?

वाचा वेदर रिपोर्ट…!

गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागांना गारपीटीने चांगलंच झोडपून काढलं आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून रब्बी हंगामातील पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Unseasonal Rain Alert in Maharashtra

भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. इतकंच नाही तर, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

बंगालच्या उपसागरावरून राज्यातील हवामान बदललं असून वाऱ्यांच्या आद्रतेचे प्रमाण वाढल्याने कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यातही ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी (Rain Alert) कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

इंडियन ऑयल सोलर स्टोव 2024 योजना का ऑनलाईन

आवेदन करने के लिए यहा क्लिक करे

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय.

₹100000 तक किसान कर्ज माफ़ लाभार्थी लिस्ट

यहाँ क्लिक कर चेक करे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *