BlogTrending

cotton production:शेतकऱ्यांनो कापूस उत्पादनासाठी हे ५ वाण खरेदी करा एकरी देतात १८ ते २० क्विंटल उत्पादन

cotton production कापूस पिकाला वेळीच बियाणे मिळाल्यास योग्य जातीची निवड करणे सोपे जाते. कापसाच्या वाणांची निवड करताना शेतकऱ्यांनी त्या जातीच्या उत्पादक क्षमतेवर विशेष लक्ष द्यावे. कारण चांगल्या जातीमुळेच मोठे उत्पादन मिळू शकते. या खरीप हंगामात कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तीन चांगल्या जाती निवडण्याची संधी उपलब्ध आहे.

प्रवर्धन सीड्स कंपनीची ‘रेवंथ’

रेवंथ ही कापसाची जात गेल्या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली होती. महाराष्ट्रातील हवामान या कापसाच्या जातीच्या लागवडीसाठी योग्य असून अनेक शेतकऱ्यांनी या जातीपासून 15 ते 20 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन घेतले आहे. त्यामुळे या जातीवर विसंबून राहणे शेतकऱ्यांना परवडेल.

तुळशी सीड्स कंपनीची ‘कबड्डी’

‘कबड्डी’ ही तुळशी सीड्स कंपनीची कापसाची वाण आहे. ही जात राज्यातील मुख्य कापूस उत्पादक प्रदेश विदर्भ आणि मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी या जातीची कधी ना कधी लागवड केली असावी. कमी किंवा जास्त पाण्यात देखील चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी या जातीकडे आकृष्ट होतात.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी जाहीर

येथुन चेक करा आपले नाव

अजित सीड्स कंपनीचा ‘अजित 155’

अजित सीड्स कंपनीच्या ‘अजित 155’ या कापसाच्या जातीची लागवड राज्यातील बहुतांश भागात केली जाते. खान्देश प्रदेशातही या जातीची लागवड होते. विदर्भ व मराठवाडा येथेही अजित 155 चा वावर मोठ्या प्रमाणात केला जातो. या जातीपासून शेतकऱ्यांना जोमदार उत्पादन मिळत असल्याचे आढळून आले आहे.

वरील माहितीवरून असे लक्षात येते की, परंपरागत कापूस जाती आणि नवनवीन संकरित जातींपैकी शेतकऱ्यांची निवड काही ठराविक जातींवरच अधिक प्रमाणात केंद्रित झाली आहे. कारण या जाती चांगले उत्पादन देत असल्याने शेतकरी त्यांच्याकडेच आकर्षित होतात.

त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतजमिनीची परिस्थिती आणि हवामानाचा विचार करून योग्य जातीची निवड करणे गरजेचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढेल.

सुपरकोट BGII 115

सुपरकॉटन BGII 115 ही कापसाच्या सर्वात प्रगत जातींपैकी एक मानली जाते. कपाशीची ही जात शोषक कीटकांना सहनशील मानली जाते आणि शेतकरी बागायती आणि बिगर सिंचन अशा दोन्ही ठिकाणी त्याची लागवड करू शकतात. या जातीचा कापूस मध्यम आणि भरलेल्या जमिनीत सहज पेरता येतो. या कपाशीची पेरणी केल्यानंतर त्याचे पीक साधारण 160 ते 170 दिवसांत तयार होते. कापसाच्या या जातीची लागवड करून शेतकरी एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन घेऊ शकतात.

इंडो यू 936 BGII

इंडो 936 BGII जातीची लागवड केल्याने शेतकऱ्यांना प्रति एकर 15 ते 20 क्विंटल उत्पादन मिळते. कापसाची ही जात शोषक कीटकांनाही सहनशील आहे. शेतकरी या जातीच्या कपाशीची पेरणी बागायत आणि बिगर सिंचन अशा दोन्ही ठिकाणी करू शकतात. हलक्या आणि मध्यम जमिनीवर याची लागवड सहज करता येते. पेरणीनंतर त्याचे पीक तयार होण्यासाठी 155 ते 160 दिवस लागतात.

कमी खर्चात जास्त नफा ,सरकार देतेय कुक्कुटपालन व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत अनुदान

येथे ऑनलाइन अर्ज करा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *