BlogBusinessBusiness IdeasSarkari YojanaTrending

Goat Farming Business : शेळीपालनासाठी ‘ही’ बँक देते 50 लाखांपर्यंत कर्ज; वाचा व्याजदर, संपूर्ण प्रक्रिया

Goat Farming Business 2024 सद्यस्थितीत सर्वच शेतमालाला योग्य दर (Goat Farming Business) मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्चही मिळत नाहीये. परिणामी, वर्षानुवर्षे तोट्याची शेती करण्यापेक्षा काहीतरी नवीन व्यवसाय किंवा जोडधंदा करून चांगला नफा कमवावा, अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा असते. विशेषतः तरुण शेतकऱ्यांना आपला व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आता तुम्हालाही शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या शेळीपालन व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज कसे मिळवायचे? किती मर्यादपर्यंत कर्ज मिळते? कोणती कागदपत्रे लागतात? कर्जाचा व्याजदर किती असतो? याबाबत आज आपण सविस्तरपणे (Goat Farming Business) जाणून घेणार आहोत.

शेळीपालन 50 लाखांच्या अनुदानासाठी

येथे ऑनलाइन अर्ज करा

मुद्रा लोन योजना (Goat Farming Business Bank Loan)

शेळीपालन हा व्यवसाय गैर-कृषी व्यवसायात मोडतो. ज्यामुळे त्याला सरकारकडून सूक्ष्म- लघु आणि मध्यम व्यवसायाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारकडून शेळीपालनासाठी (Goat Farming Business) अनुदानावर शेळ्यांचे गट वाटप केले जाते. मात्र ही योजना अनुसूचित जाती- जमातीच्या शेतकऱ्यांसाठी असते. त्यामुळे अशावेळी सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या क्षमतेने शेळीपालन करायचे असेल. तर केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या क्षमतेने कर्ज उपलब्ध करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. देशातील अनेक नामांकित बँका शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी हे कर्ज उपलब्ध देतात.

नाबार्ड डेअरी लोन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

‘ही’ बँक देते 50 लाखांपर्यंत कर्ज

देशातील उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या आयडीबीआय बँकेकडून शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी कर्ज दिले जाते. बँकेच्या या योजनेचे नाव “कृषी कर्ज शेळी- मेंढी पालन” असे आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे आता तुम्हांलाही शेळीपालनासाठी (Goat Farming Business) कर्ज मिळवायचे असल्यास आयडीबीआय बँक तुम्हाला 50 हजार रुपयांपासून ते 50 लाखांच्या दरम्यानच्या मयदित तुमच्या प्रकल्प अहवालानुसार कर्ज देते. या कर्जासाठी बँक तुम्हांला 7 टक्के इतका व्याजदर लागू करते.

असे अर्ज करा.

कोणती कागदपत्रे लागतात?

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • तुमचा शेळीपालन व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधारकार्ड
  • पॅन कार्ड
  • बीपीएल कार्ड (उपलब्ध असेल तर)
  • जात प्रमाणपत्र (एससी, एसटी, ओबीसी असेल तर)

कुठे कराल अर्ज?

  • शेळीपालनासाठीचे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या आयडीबीआय बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
  • त्या ठिकाणी तुम्ही शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी सविस्तर माहिती बँक अधिकाऱ्यांकडून समजावून घ्या.
  • त्यानंतर त्यांच्याकडून कर्जासाठी अर्ज घेऊन तो भरा.
  • या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. व आवश्यक कागदपत्रे जोडून तो बँकेत जमा करा.
  • बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करून, तुमचा शेळीपालन व्यवसायाचा प्रकल्प अहवाल बघून कर्ज मंजूर करण्याची संपूर्ण प्रकिया पूर्ण करेल.

शेळीपालन व्यवसाय हा पशुधन व्यवसायाअंतर्गत येतो. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मांस उत्पादनातून मोठी कमाई मिळते. याशिवाय काही प्रमाणात शेळीचे दूध देखील विकले जाते. शेळीचे दूध हे फायबरचा प्रमुख स्रोत मानले जाते. ज्यामुळे व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून शेळीपालन करत, मोठी कमाई केली जाऊ शकते. त्यामुळे अशातच तुम्ही शेळीपालन व्यवसाय करण्याची इच्छा बाळगून असाल तर ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी पडणार आहे. (Goat Farming Business)

दूध डेअरी उघडण्यासाठी, नाबार्ड डेअरी देत आहे कर्ज

असा करा अर्ज 2024.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *